https://www.youtube.com/watch?v=KJS2JyQZowo

भक्तांच्या पाहुणचाराचा स्वीकार करत सर्वांचाच लाडका बाप्पा निरोप घेत आहे. अनेकांच्या आर्जवी प्रार्थना ऐकणाऱ्या आणि भक्तांवर नेहमीच आशीर्वादाचा वरदहस्त ठेवणाऱ्या लालबागच्या राजाची शान काही औरच. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी काही मानाच्या मंडळांमध्ये लालबागच्या राजा अग्रस्थानी आहे. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रिघ लागते. अशा या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत.